महिलेने पतीला बर्थडे गिफ्ट म्हणून दिली तब्बल 3.5 कोटींची रोख रक्कम

(Source)

एखाद्याला आपण भेटवस्तू म्हणून त्याच्या आवडीची एखादी छोटी-मोठी वस्तू देत असतो. मात्र एका महिलेने आपल्या पतीला अशी भेटवस्तू दिली की, त्याने सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहेत. प्रसिद्ध रॅपर ऑफसेटला त्याच्या वाढदिवसानिमित्त पत्नी कार्डी बीने दिलेल्या भेटवस्तूची सध्या जोरदार चर्चा आहे. कार्डीने पतीला वाढदिवसाची भेट म्हणून चक्क 3.5 कोटी रुपये रोख दिले. यामुळे त्यांचे संपुर्ण फ्रीजच भरून गेले.

View this post on Instagram

🖤

A post shared by Cardi B (@iamcardib) on

याचा व्हिडीओ कार्डीने इंस्टाग्रावर शेअर केला आहे. भेट वस्तू देताना कार्डीने फ्रीजकडे इशारा केला. एका व्यक्तीने फ्रीज उघडल्यावर त्यात तब्बल 50,000 डॉलर होते.

व्हिडीओमध्ये कार्डी बोलत आहे की, तुझ्याजवळ सर्व काही आहे. याद्वारे तू माझ्यासाठी अथवा मुलांसाठी काहीही खरेदी करू शकतोस. वर्ष 2017 ला कार्डी आणि ऑफसेटने लग्न केले होते. दोघांना 1 मुलगी देखील आहे.

Leave a Comment