एअर फ्रेशनरच्या अती वापरामुळे कारमध्ये झाला स्फोट

(Source)

धुम्रपान करणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र कधीकधी हे धुम्रपान मोठ्या नुकसानाला देखील कारणीभूत ठरते.

कारजवळ धुम्रपान करणे इंग्लडमधील एका व्यक्तीला चांगले महागात पडले आहे. कारजवळ सिगरेट पेटवल्यामुळे कारचा मोठा स्फोट झाला. मात्र कारचालक या घटनेतून थोडक्यात बचावला. धमाका एवढा मोठा होता की, यामुळे विंडस्क्रीन आणि खिडक्याच्या काचांचा भूगा झाला.

वेस्ट शायर येथे कारचालकाने सिगरेट पिण्यासाठी रस्त्याच्या कडेला कार थांबवली. यावेळी त्याने कारमध्ये एअर फ्रेशनर स्प्रे केला. त्यानंतर सिगरेट पेटवल्याने मोठा धमाका झाला. चालक या घटनेतून थोडक्यात बचावला. एअर फ्रेशनरच्या अती वापरामुळे ही घटना घडली. पोलिसांनी ऐरेसोल कॅनचा अती वापर टाळण्यास सांगितले आहे.

Leave a Comment