‘चिकन लेग पीस’ खाण्यासाठी टीक-टॉकवर प्रसिद्ध आहे हा गडी

(Source)

शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म टिकटॉकवर आज एखादी व्यक्ती कोणत्या गोष्टीमुळे प्रसिद्ध होईल काही सांगता येत नाही. अशीच एक व्यक्ती चिकन लेग पीस खाण्यासाठी टिकटॉकवर लोकप्रिय झाली आहे. या व्यक्तीचे नाव उल्हास कामठे असून, टिकटॉकवर चिकन लेग पीस खातानाचे त्यांचे व्हिडीओ लोकप्रिय आहेत.

त्यांना टिकटॉकवर 13 लाख लोक फॉलो करतात. तर 2 कोटींपेक्षा अधिक जणांनी त्यांच्या पेजला लाईक केले आहे.

त्यांनी 31 ऑक्टोंबर 2019 ला चिकन लेग पीस खातानाचा व्हिडीओ शेअर केला होता, जो खूपच व्हायरल झाला. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या डिशबरोबर चिकन लेग पीस खाण्यास सुरूवात केली.

उल्हास कामठे यांच्या प्रत्येक व्हिडीओमध्ये चिकन लेग पीस असतो. त्यांच्या या हटके अंदाजामुळे त्यांचे जगभरात चाहते आहेत. ट्विटरपासून ते युट्यूबपर्यंत त्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.

Leave a Comment