आयटीबीपीच्या जवानांसाठी खास मॅट्रोमोनियल पोर्टल

(Source)

भारत तिबेट सीमा पोलीस दलाने आपल्या अविवाहित अथवा घटस्फोट झालेल्या जवानांना दलाच्या आतच योग्य जोडीदार मिळावा यासाठी एक मॅट्रिमोनियल पोर्टल सुरू केले आहे.

कोणत्याही अर्धसैनिक दलात पहिल्यांदाच असे पाऊल उचलण्यात आलेले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या दलाकडे मुख्यता चीनशी लगत असलेल्या नियंत्रण रेषेची जबाबदारी आहे. या दलात विविध रँकमधील जवळपास 2500 पुरूष व 1000 महिला अविवाहित आहेत.

आयटीबीपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक जवान हे दुर्भम भागात तैनात आहेत. यामुळे त्यांच्यासाठी त्यांच्या परिवाराकडून एक चांगला जोडीदार निवडणे अवघड काम आहे.

त्यांनी सांगितले की, काही आकड्यांनुसार, सध्या दलात जवळपास 333 कार्यरत दांपत्य आहेत. अनेक जवांनाना याच दलात कार्य करणारा जोडीदार हवा असतो. कारण सरकारी नियमानुसार, त्या दांपत्यांना एकाच ठिकाणी तैनात राहण्याची सुविधा असते.

या दुर्गम भागात सोबत काम करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. यामुळे दलात कार्यरत दांपत्यांना नक्कीच आनंद होईल.

 

Leave a Comment