फाशी देणाऱ्यांना जल्लादला किती पगार मिळतो ?


दिल्लीतील बहुचर्चित निर्भया हत्याकांडातील नराधमांना या महिन्यात कधीही फासावर लटकवण्यात येऊ शकते. या नराधमांना पवन जल्लाद फाशी देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संपूर्ण जगात फाशी देणे हा एक वेगळा व्यवसाय असून काही देशांमध्ये ही पूर्णवेळ नोकरी असते, तर काही देशांमध्ये ही पार्ट नाइम नोकरी असते. आम्ही आज तुम्हाल याच जल्लादला या कामासाठी किती पगार मिळतो याबद्दलची माहिती सांगणार आहोत.

चीन, इराण, सौदी अरेबिया, इराक आणि व्हिएतनामसह जगातील पाच देशांमध्ये सर्वाधिक फाशीची शिक्षा दिली जाते. चीनमध्ये फाशीची शिक्षा सहसा रांगेत दिली जाते, परंतु इराण, इराक, सौदी अरेबिया आणि व्हिएतनाममध्ये फाशी किंवा शिरच्छेद करून मृत्यूदंडांची शिक्षा दिली जाते.

सध्या फाशी देणारे भारतात दोनच अधिकृत जल्लाद आहेत. जे उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील आहेत. पश्चिम बंगालमध्ये 2000 च्या दशकापर्यंत एक प्रसिद्ध जल्लाद असायचा. नटा मल्लिक म्हणून त्याला ओळखले जाते. नोंदीनुसार 25 हून अधिक लोकांना त्याने फाशी दिली. 2004 मध्ये धनंजय चटर्जी याला कोलकाता येथील रहिवासी नटा मल्लिकने अखेरची फाशी दिली होती. धनंजय हा एका अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक होता, जिथे त्याने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली.

पुण्यातील येरवडा तुरूंगात मुंबई हल्ल्यात पकडलेला एकमेव पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला फाशी देण्यात आली होती, त्याला फाशी देणाऱ्याचे नाव बाबू जल्लाद असे असले तरी या जल्लादाची ओळख कधीच समोर आली नाही. नंतर या फाशीसाठी जल्लादला पाच हजार रुपये देण्यात आल्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. महाराष्ट्र पोलिसातील हा जल्लाद कुणीतरी असल्याचे सांगण्यात आले. याकूब मेननलाही त्यानेच फाशी दिली होती.

नाटा मल्लिक यांनी फाशी दिल्यानंतर दोरखंडाची विक्री केली. त्यांनी एक दोरखंड सुमारे 2000 रुपयांना विकले. ज्यात जुन्या फाशीचे दोरखंड देखील होते. तो एक दोरखंड 500 रुपयांना विकत असे. नाटा मल्लिक हा पश्चिम बंगालचा एक सुप्रसिद्ध जल्लाद होता. तो फाशी देऊन दोरी सोबत घेऊन जायचा. तर या दोरीचे लॉकेट बनवून घातल्यानंतर नशिब बदलते अशी त्याची अंधश्रद्धा होती.

त्याचे 2008साली निधन झाल्यानंतर त्याचा मुलगा मेहताब हे काम करत आहे. सामान्यत: फाशी देणाऱ्यांची वंशावळ असते. नटा मल्लिकच्या आधी त्याचे वडील हेच काम करायचे. नटा मल्लिक हा भारतात सर्वाधिक पैसे मिळवणारा जल्लाद असल्याचे म्हटले जाते.

Leave a Comment