अमोल कोल्हे १८ तारखेला मोठी घोषणा करणार


मुंबई: राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकतीच आपल्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट करुन १८ डिसेंबरला आपण एक मोठी घोषणा करणार असल्याचे म्हटल्यामुळे आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

सध्या डॉ. अमोल कोल्हेंची स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका लोकप्रिय आहे. त्याचबरोबर शिरुर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे खासदार म्हणून निवडून आले असल्याने काही राजकीय विषयावर बोलणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. तर ही जणांनी अमोल कोल्हे हे कॅबिनेट मंत्री व्हावे, अशी इच्छा बोलून दाखवली आहे. अमोल कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर त्यांनी शिरूर मतदारसंघातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आढळराव शिवाजीराव पाटील यांचा पराभव केला होता.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढली होती. अमोल कोल्हे यांनी या यात्रेचे नेतृत्व केले होते. त्यांच्या जाहीर सभांना संपूर्ण महाराष्ट्रात मागणी होती. त्यांनी अक्षरश: महाराष्ट्र पिंजून काढला होता. निवडणुकीत राष्ट्रवादीला याचा चांगलाच फायदा झाला होता. दरम्यान, बैलगाडी शर्यत आणि गड किल्ल्यांचा विषय गेल्या काही काळापासून अमोल कोल्हे यांनी लावून धरला आहे. त्यामुळे ठाकरे सरकार याबाबत काही मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता अनेकजणांकडून वर्तविली जात आहे.

Leave a Comment