सोशल मीडियावर घोंघावत आहे मलायका नावाचे वादळ


सोशल मीडियावर सध्याच्या घडीला मलायका अरोरा नावाचे वादळ घोंघावत आहे. कारण मलायकाने नुकतेच सोशल मीडियावर आपले नवे फोटो शेअर केले असून ते वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

🧚‍♂️

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on


या फोटोमध्ये मलायका खूप सुंदर दिसत असून अवघ्या काही तासातच यावर चाहत्यांकडून तुफान प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. मलायकाच्या या फोटोजवर चाहत्यांचे लाईक्स आणि कमेंट्स यांचा अक्षरशः पाऊस पडला आहे.


आपले नवनवे फोटो शेअर करुन मलायका ही नेहमी प्रसिध्दीच्या झोतात राहत असते. आपल्या नव्या कामाचे फोटो ती नेहमी सोशल मीडियावर पोस्ट करीत असते. काही दिवसांपूर्वी मलायकाने ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शोचे गीता कपूर आणि टेरेन्स लुईस यांच्यासह परीक्षण केले होते.


मलायका आणि अर्जुन कपूर यांचे प्रेमप्रकरण सध्या सिनेजगतात चर्चेचा विषय आहे. त्यांनी अद्याप लग्न कधी करायचे हे ठरवलेले नसले तरी त्यांनी ही गोष्ट लपवलेली नाही. लग्नाचा निर्णय योग्यवेळी सांगितला जाईल, असे तिने एका मुलाखती दरम्यान म्हटले होते. अर्जुनने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फोटो शेअर करीत मलायकाला शुभेच्छा दिल्या होत्या. मलायकाच्या या नव्या फोटाशूटने तिचे चाहते सुखावले आहेत.

Leave a Comment