‘या’ अभिनेत्याने एका वर्षात कमावले तब्बल ४७५ कोटी रुपये


सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये आयुषमान खुराना याची गणती केली जाते. त्याच्या सिने कारकिर्दीसाठी २०१९ हे वर्ष सर्वोत्कृष्ट ठरले असून या वर्षात त्याने सलग तीन सुपरहिट चित्रपटांच्या जोरावर तब्बल ४७५ कोटी रुपयांची कमाई केली. आयुषमानला या अचंबित करणाऱ्या कमाईमुळे बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांच्या यादीत स्थान मिळाले आहे.

२०१९मध्ये ‘आर्टिकल १५’, ‘ड्रिम गर्ल’ आणि ‘बाला’ या तीन चित्रपटांमध्ये आयुषमानने काम केले. विशेष म्हणजे हे तीनही चित्रपट वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट एक ठरले आहेत. आयुषमानने या तीन चित्रपटांच्या जोरावर जगभरातून तब्बल ४७५ कोटी रुपयांची कमाई केल्यामुळे आयुषमानला आता बॉलिवूडमधील नवा सुपरस्टार म्हटले जात आहे.

माझ्यासाठी २०१९ हे वर्ष कमालीचे ठरले असून मी कुठलाही नवा चित्रपट स्विकारताना नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो. प्रेक्षकांना हे प्रयोग आवडत असल्यामुळे माझ्या चित्रपटांना ते भरभरुन प्रतिसाद देत असल्याचे म्हणत त्याने प्रेक्षकांचे आभार मानले.

Leave a Comment