जाहिरनाम्यातील ‘त्या’ घोषणेला ठाकरे सरकार देऊ शकते मंजुरी


मुंबई – विधानसभा निवडणुकीत आपल्या जाहीरनाम्यात दिलेले 10 रुपयांत जेवणाचे वचन शिवसेना पूर्ण करणार आहे. या प्रस्तावास आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विधानसभा निवडणूक भाजपसोबत लढवणाऱ्या शिवसेनेने आपला स्वतंत्र जाहीरनामा जाहीर केला होता, ज्यामध्ये अनेक आश्वासने देण्यात आली होती.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे निवडणुकीच्या प्रचारावेळी म्हणाले होते की, गरिबांसाठी 10 रुपयांत भोजन थाळीच्या योजनेअंतर्गत एक विशेष कँटींग सुरु करण्यात येईल. यामध्ये 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत जेवण मिळेल. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने सरकार स्थापन करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता सरकार स्थापनेच्या पंधरवड्यानंतर स्वत:चे हे वचन पूर्ण करणार आहेत.

विशेष म्हणजे जेव्हा शिवसेना भाजपप्रणीत सरकार 1995 साली सत्तेत आले तेव्हा शिवसेनेच्या नेतृत्वात सरकारने 1 रुपयात झुणका भाकर योजना सुरू केली. शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांना यासाठी झुणका भाकर केंद्र उघडण्यासाठी जागा देण्यात आली होती. पण, नंतर या केंद्रांवर झुणका-भाकरऐवजी चायनीजची विक्री होत होती आणि ही योजना फ्लॉप झाली.

Leave a Comment