अनोख्या पद्धतीने विद्याने सांगितली ‘शकुंतला देवी’ची रिलीज डेट


लवकरच मानवी संगणक अशी ओळख असणाऱ्या ‘शकुंतला देवी’ यांच्या बायोपिकमध्ये अभिनेत्री विद्या बालन झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांना या चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहायला मिळाला. आता या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून खास गणितीय भाषेत विद्या बालनने रिलीज डेट सांगितली आहे.


गणित विषयात मानवी संगणक अशी ओळख असणाऱ्या शकुंतला देवी या अतिशय पारंगत होत्या. त्यांनी अनेक अवघड अवघड गणितीय समीकरणे बोटावर सोडवली आहेत. त्यामुळेच त्यांचा प्रवास मोठ्या पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. ‘शकुंतला देवी’ या बायोपिकमध्ये त्यांच्या अचाट बुद्धीची गाथा पाहायला मिळणार आहे. यामध्ये मुख्य भूमिकेत विद्या बालन दिसणार आहे.

यामध्ये महत्वपूर्ण भूमिकेत अभिनेत्री सान्या मल्होत्राही झळकणार आहे. हा चित्रपट ८ मे २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनू मेनन करत आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती सोनी पिक्चर्स नेटवर्क अंतर्गत केली जात आहे.

Leave a Comment