अभिजीत बॅनर्जी यांनी पारंपरिक वेशभूषेत स्वीकारला नोबेल पुरस्कार


स्टॉकहोम – स्वीडन देशाची राजधानी स्टॉकहोम येथे मंगळवारी नोबेल पुरस्कार प्रदान करण्याचा मोठा सोहळा संपन्न झाला. भारतीय वंशाचे अभिजीत बॅनर्जी यांना या सोहळ्यात पुरस्कार प्रधान करण्यात आला. अभिजीत बॅनर्जी या कार्यक्रमात भारतीय पारंपरिक वेशभूषेत दिसल्यामुळे त्यांचे जगभरातून कौतुक केले जात आहे.

भारतीय वंशाचे अमेरिकी संशोधक अभिजीत बॅनर्जी यांना वैश्विक गरिबी निर्मूलनाविषयी केलेल्या प्रयोगशील संशोधनासाठी यावर्षीचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला होते. स्वीडन देशाची राजधानी स्टॉकहोमच्या स्टॉकहोम सिटी हॉलमध्ये मंगळवारी नोबेल पुरस्कार प्रधान करण्याचा सोहळा संपन्न झाला. भारताचे अभिजीत बॅनर्जी यांना या कार्यक्रमात नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अभिजीत बॅनर्जी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी भारतीय पारंपरिक वेशभूषेत पोहोचले होते. त्यामुळे अनेकांच्या नजरा अभिजीत यांच्याकडे खिळल्या. दरम्यान, त्यांना हा पुरस्कार स्वीडनचे राजा कार्ल गुस्ताफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांच्यासोबतच वैश्विक गरिबी निर्मूलनाविषयी केलेल्या प्रयोगशील संशोधनासाठी एस्थेर डफ्लो आणि आणि मायकेल क्रेमर यांना देखील हा पुरस्कार प्रधान करण्यात आला.

Leave a Comment