रेडमीचा 5जी सपोर्ट स्मार्टफोन लाँच

(Source)

चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने चीनमधील एका इव्हेंटमध्ये रेडमी के30 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 4जी आणि 5जी अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. या फोनचे वैशिष्ट्य सांगायचे तर यात 4500एमएएचची बॅटरी, 20 मेगापिक्सल प्रायमेरी सेल्फी कॅमेरा आणि अँड्राईड 10 वर आधारित MIUI 11 वर चालतो.

(Source)

रेडमी के30 5जी किंमत –

रेडमी के30 5जी 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,999 युआन (जवळपास 20,100 रुपये) पासून सुरू होते. 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 2,299 युआन (23,100 रुपये), 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 2,599 युआन (26,100 रुपये) आणि 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 2,899 युआन (29,100 रुपये) आहे. हा फोन डीप सी लाइट, टाइम मोनोलॉग, फ्लावर शॅडो, पर्पल झेड फँटसी या रंगात मिळेल.

(Source)

रेडमी के30 4जी किंमत –

तर दुसरीकडे रेडमी के30 4जी च्या 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,599 युआन (जवळपास 16,100 रुपये) आहे. 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,699 युआन (17,100 रुपये), 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,899 युआन (19,100 रुपये) आणि 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 2,199 युआन (22,100 रुपये) आहे.

(Source)

रेडमी के30 4जी, रेडमी के30 5जी स्पेसिफिकेशन, फीचर्स –

रेडमी के30 ड्युअल सिम स्मार्टफोन अँड्राईड 10 वर आधारित MIUI 11 वर चालेल. यामध्ये 6.67 इंच फूल एचडी+ होल पंच डिस्प्ले (1080×2400 पिक्सल) मिळेल. फोनवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे.  या फोनच्या 5जी व्हेरिएंटमध्ये स्नॅपड्रॅगन 765 प्रोसेसर देण्यात आले आहे. तर 4जी व्हेरिएंटमध्ये 735जी प्रोसेसर मिळेल.

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात 4 रिअर कॅमेरे देण्यात आलेले आहेत. यात 64 मेगापिक्सल प्रायमेरी कॅमेरा आहे. तर दुसरा कॅमेरा 5 मेगापिक्सल आहे. 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि 120 डिग्री वाइड अँगल 8 मेगापिक्सल कॅमेरा आहे. 4जी व्हेरिएंटमध्ये 5 मेगापिक्सल मॅक्रो कॅमेऱ्याच्या जागी 2 मेगापिक्सल सेंसर कॅमेरा आहे.

(Source)

दोन्ही व्हेरिएंटमध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा मिळेल. यातील 20 मेगापिक्सल प्रायमेरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे.

यामध्ये 4,500 एमएएचची बॅटरी देण्यात आली असून, जी 30 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. तर 4 जी व्हेरिएंटमध्ये 27 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात एनएफसी, 5 जी जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 एमएम ऑडिओ जॅक मिळेल.

Leave a Comment