102 आणि 88 वर्षीय मित्रांचा पहिला म्यूझिक अल्बम ठरला सुपरहिट

(Source)

सेवानिवृत्त दोन वृद्ध मित्रांनी आपला पहिला अल्बम सीनियर साँग बूक 15 नोव्हेंबरला रिलीज केला होता. यामध्ये 8 गाणी होती, जी लोकांना खूपच आवडत आहेत. त्यांचे कौतूक केले जात असून, या अल्बमचे पहिले एडिशन अगदी काही दिवसातच विकले गेले आहे. या अल्बमची किंमत 17 डॉलर (जवळपास 1200 रुपये) आहे. जर तुम्हाला डाउनलोड करायचे असेल तर यासाठी 10 डॉलर खर्च करावे लागतील.

102 वर्षांचे ट्रिप्प आणि 88 वर्षीय वीसबोर्ड समोरासमोर राहतात. ट्रिप्प यांनी सांगितले की, आम्ही या अल्बमसाठी वय वाढले की मित्र दूर जातात त्याविषयी गीत लिहिले आहे.

ट्रिप्प यांनी सांगितले की, एकदा वीसबॉर्ड पियानो वाजवत असताना त्या संगीतावर मी काही ओळी गायल्या. तेव्हा त्यांना विचार आला की, एखाद्या वृद्धाच्या आयुष्यात, वाढत्या वयात काय अनुभव येतो तो संगीताच्या माध्यामातून सांगावा. त्यानंतर ट्रिप्प यांनी गीत लिहिले आणि त्याला संगीत दिले. दोघांनी 2 वर्ष दररोज 30 मिनिट गीत-संगीताचा सराव केला, तेव्हा त्याला अल्बमचे स्वरूप आले.

त्यांनी सांगितले की, ज्या प्रकारे विजय मिळवण्यासाठी जुना बॉलर नवीन बॉलरला काही टिप्स देतो. त्याचप्रमाणे आम्ही दोघांनी आयुष्यातील खऱ्या प्रेमापासून ते ब्रेकअपचा अनुभव या विषयांवर 8 गाणी तयार केली. दोघांनी आपल्या वयाच्या 14 वर्षांपासूनच्या अनुभवांचा यात समावेश केला.

अल्बम बनविण्यासाठी दोघांनी पेन्सेलवेनिया स्टुडिओमध्ये गाणी रेकॉर्ड केली. या अल्बममधील गाणी केवळ वृद्धांनाच नाही तर युवा पिढीला देखील प्रेरणा देत आहेत.

Leave a Comment