आता एअरटेलचे ग्राहक वाय-फायद्वारे फ्रीमध्ये करू शकणार कॉलिंग

(Source)

नवीन टेरिफ प्लॅन लागू केल्यानंतर आता एअरटेलने वाय-फाय सर्विस लाँच केली आहे. एअरटेलने या नवीन सेवेला एअरटेल वाय-फाय कॉलिंग नाव दिले आहे. या नवीन सेवेची खास गोष्ट म्हणजे यात युजर्स फ्रीमध्ये इंटरनेटच्या मदतीने फोनवर बोलू शकतात.

काय आहे वाय-फाय कॉलिंग ?

वाय-फाय कॉलिंगला वॉइस ओव्हर वाय-फाय अथवा VoWiFi देखील म्हटले जाते. वाय-फायद्वारे तुम्ही वाय-फाय, पब्लिक वाय-फाय आणि वाय-फाय हॉटस्पॉटच्या मदतीने कॉलिंग करू शकतील. उदाहरणार्थ वाय-फाय अथवा हॉटस्पॉट घेऊन फोनवर आरामशीर बोलू शकता. वाय-फायचा सर्वात मोठा फायदा रोमिंगचा आहे. कारण तुम्ही कोणत्याही वाय-फायद्वारे मोफत बोलू शकता.

ज्यांचे जुने फोन आहेत, त्यामध्ये ही सुविधा नसेल. जर तुमच्याकडे एअरटेलचे सिम असेल, तर तुम्हाला मेसेज देखील आला असेल. ही सेवा सध्या वनप्लस, शाओमी, अपल आणि सॅमसंगसारख्या मोजक्याच फोनवर उपलब्ध आहे. ही सेवा सध्या दिल्ली-एनसीआर भागातच उपलब्ध आहे.

सॅमसंग फोनबद्दल सांगायचे तर गॅलेक्सी जे6, सॅमसंग ऑन 6, सॅमसंग गॅलेक्सी एम30एम आणि गॅलेक्सी ए10एस यामध्ये वाय-फाय कॉलिंग सपोर्ट मिळत आहे. शाओमीच्या पोको एफ1, रेडमी के 20 आणि रेडमी के20 प्रो या फोनमध्ये तसेच, वनप्लसच्या वनप्लस 7, वनप्लस 7 प्रो, वनप्लस 7टी प्रो स्मार्टफोनमध्ये ही सेवा मिळत आहे. अपलच्या आयफोन 6 नंतरच्या सर्व आयफोनमध्ये ही सेवा मिळते.

सेटिंग –

तुमच्या फोनमध्ये वाय-फा. कॉलिंग सपोर्ट असेल तरच तुम्ही सेवा वापरू शकता. फोनच्या सेटिंग्समध्ये नेटवर्क सेटिंग्समध्ये तुम्ही तपासू शकता.

Leave a Comment