लवकरच रस्त्यावर धावताना दिसणार ‘ड्रायव्हरलेस’ कार

(Source)

गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटच्या मालकीची कंपनी ‘वेमो’ गेली अनेक वर्षांपासून सेल्फ ड्रायव्हिंग कारची चाचणी करत आहे. गेली अनेक दिवस सेल्फ ड्रायव्हिंग कारमध्ये विशेष लक्ष देण्यासाठी खास ड्रायव्हरची नेमणूक करण्यात येत असे व ही सेवा अगदी मोजक्याच लोकांसाठी उपलब्ध होते. मात्र आता कंपनीने ही सेवा मोठ्या प्रमाणात वाढवणार असल्याचे सांगितले आहे. तसेच, आता ही कार पुर्ण ड्रायव्हर विरहित असेल. यामध्ये चालक कोणत्याच प्रकारचे लक्ष देणार नाही.

2017 पासून फिनिक्स भागातच 250 किमीच्या अंतरात ही कार सर्विस देत असे. मात्र 2018 साली कंपनीने वेमो वन नावाने लिमिटेड पब्लिक राईड सर्विस सुरू केली. मात्र ठरावीक लोकांनाच ही सेवा मिळत असे. मागील आठवड्यात वेमोने स्पष्ट केले की, त्यांचे महिन्याला 1500 एक्टिव युजर्स आहेत. 2017 मध्ये कंपनीचे सीईओ जॉन क्रॅफसिक यांनी फूल ड्रायव्हरलेस कार बाजारात आणत असल्याचे सांगितले होते, मात्र अद्याप ही कार बाजारात आलेली नाही.

एका ठराविक भागातच कार प्रवाशांना पिकअप आणि ड्रॉप ही सेवा देते. मात्र कंपनी हळहळू इतर भागात देखील कारची सेवा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

या कारवर कर्मचारी 8 कॅमेऱ्याद्वारे लक्ष देण्यात येते व पुश बटनद्वारे ते मदत करतात. पुर्ण ड्रायव्हर विरहित आणि कोणतेही अडथळे निर्माण न करणारी कारला बाजारात येण्यात आणखी 10 वर्ष लागतील.

Leave a Comment