तब्बल 10 वर्षांनंतर सुष्मिता सेनचे बॉलीवूडमध्ये पुनरागमन


तब्बल 10 वर्षांनंतर माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेन बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा पदार्पण करणार आहे. सुष्मिताने मी माझ्या चाहत्यांसाठी बॉलिवूडमध्ये परतण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबद्दलची माहिती सुष्मिताने दिली आहे.


मिस युनिव्हर्सचा किताब जिंकलेल्या सुष्मिताने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. तसेच तरुण वयात 2 मुलींना सुष्मिताने दत्तकही घेतले. तिने या मुलींच्या संगोपनासाठी बॉलिवूडमधून विश्रांती घेतली होती. परंतु, सुष्मिता आता तब्बल 10 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये परतणार आहे.


दरम्यान, बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याची घोषणा सुष्मिताने केल्यानंतर तिला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या घोषणेमुळे चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सुष्मिताने बिवी नंबर 1, मै हूँ ना, आँखे, सिर्फ तुम, क्योंकी मैं झूठ नहीं बोलता आदी चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.


चाहत्यांच्या प्रोत्साहन आणि प्रेमामुळेच मी बॉलिवूडमध्ये परतत असल्याचे सुष्मिताने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये आहे. सुष्मिताने 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नो प्रॉब्लेम’ या चित्रपटामध्ये शेवटची भूमिका केली होती.


सुष्मिताने 2000 साली एका मुलीला तसेच 2010 मध्ये दुसऱ्या मुलीला दत्तक घेतले होते. सुष्मिताने आपल्या दोन्ही मुलीला वेळ देण्यासाठी बॉलिवूडला ब्रेक दिला होता. सुष्मिताने बॉलिवूडमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला असला तरी, आता ती कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे आगामी काळातच स्पष्ट होईल.

Leave a Comment