हिवाळ्यात या 12 बर्फाच्छादित ठिकाणांना नक्की भेट द्या

(Source)

थंडीच्या काळात बर्फ पडणाऱ्या ठिकाणी निवांत रहावे, हे एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही. तुम्ही चित्रपटात देखील अशी सुंदर बर्फाच्छादित ठिकाणं पाहिली असतील. जर तुम्ही डिसेंबर महिन्यात फिरण्याचा प्लॅन करत असाल तर या खास ठिकाणी नक्की जाऊ शकता.

(Source)

मनाली –

मनालीपासून 51 किमी लांब रोहतांगमध्ये सप्टेंबरपासून हिमवर्षाव सुरू होतो. मात्र मनाली आणि आजुबाजूच्या परिसरात डिसेंबरपासून हिमवर्षाव सुरू होतो. येथे तापमान 7 डिग्रीपर्यंत जाते. रात्री तर येथील तापमान शून्य डिग्रीपासून ते -5 डिग्री देखील असते.

(Source)

 

सोनमर्ग –

सोनमर्ग हे जम्मू आणि काश्मिरमधील एक सुंदर हिल स्टेशन आहे. याच्या आजुबाजूला कोलहोई ग्लेशियर आणि माचोई ग्लेशियर व 5000 मीटर उंच शिखरे आहेत. सोनमर्गमध्ये एप्रिल महिन्यात हिमवर्षाव होतो. डिसेंबरमध्ये येथील तापमान -5 डिग्री सेल्यिस असते.

(Source)

नॉर्थ सिक्कीम –

नॉर्थ सिक्कीममध्ये -2 डिग्रीपर्यंत तापमान असते. याशिवाय येथे Tsomgo Lake, Nathula, Yumthang, Yumesamdong, Gurudongmar Lake आणि Katao सारख्या ठिकाणी हिमवर्षाव होतो.

(Source)

औली –

औलीमध्ये डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात आणि कधी कधी जानेवारीमध्ये बर्फ पडतो. औलीला जाण्यासाठी फेब्रुवारी सर्वोत्तम आहे. कारण या काळात तेथे स्की स्पर्धेचे आयोजन केले जाते व जगभरातील लोक यात भाग घेतात.

(Source)

हेमकुंड साहिब –

डिसेंबरमध्ये वॅली ऑफ फ्लॉवर्स मोठ्या हिमवर्षावामुळे बंद होते. हेमकुंड साहिबचा मार्ग डिसेंबरमध्ये काही अनुभवी गिर्यारोहकांसाठी उघडण्यात येतो. सर्व ठिकाणी पांढऱ्या बर्फाची चादर दिसून येते आणि तापमान -10 ते -20 डिग्री सेल्सियस एवढे असते.

(source)

पहलगाम  –

जर तुम्हाला बर्फात स्नोमॅन बनायचे असेल तर डिसेंबर आणि जानेवारीमध्ये या ठिकाणी भेट द्या. या काळात येथे मोठा हिमवर्षाव होतो व तापमान शून्य डिग्रीपर्यंत पोहचते.

(Source)

मुंसियारी –

मुंसियारीमध्ये डिसेंबरच्या शेवटी बर्फ पडतो. येथे दिवसा तापमान 4 डिग्री सेल्सियस असते.

(Source)

नारकांडा –

नारकांडा एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. जे शिमलापासून 70 किमी अंतरावर आहे. नारकांडा येथे हिवाळ्यात -10 डिग्री सेल्सियस तापमान असते.

(Source)

पटनीटॉप आणि नत्था टॉप –

जम्मू आणि काश्मिरमधील आणखी एक सुंदर हिल स्टेशन म्हणजे पटनीटॉप आण थोड्या वरच्या बाजूला नत्था टॉप आहे. येथे नोव्हेंबरपासून ते फेब्रुवारीपर्यंत चांगला बर्फ पडतो. थंडीत येथील सर्वाधिक तापमान 24 डिग्री व न्यूनतम 0 ते 14 डिग्रीपर्यंत पोहचते.

(Source)

लद्दाख –

डिसेंबरमध्ये लद्दाखला जाणे अनेक लोक टाळतात. मात्र ज्यांना बर्फवर्षाव बघायचा आहे, ते आवर्जुन या ठिकाणी भेट देतात. यावेळी येथील तापमान -4 डिग्रीपर्यंत पोहचते. तर रात्रीचे तापमान -30 डिग्रीपर्यंत जाते.

(Source)

गुलमर्ग –

जम्मू आणि काश्मिरमधील आणखी एक सुंदर हिल स्टेशन म्हणजे गुलबर्ग. येथे जाताना गरम कपडे नक्की घेऊन जा. कारण डिसेंबरमध्ये येथील तापमान -8 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचते.

(source)

संगला व्हॅली –

संगला, बासपा व्हॅली एक शहर आहे. ज्याला हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यातील, तिबेट सीमेच्या जवळ सांगला व्हॅली म्हणून ओळखले जाते. येथे हिवाळ्यात जबरदस्त बर्फ पडतो.

Leave a Comment