यंदाच्या वर्षी ट्विटरवर या 10 राजकारणी मंडळींचा प्रभाव !


नवीन वर्ष सुरु होण्यास अवघे 20 दिवस शिल्लक असून त्यातच आता लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने वर्षभरातील राजकीय क्षेत्रातील प्रभावी राजकीय मंडळींच्या ट्विटर हॅन्डलची यादी प्रसिद्ध केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह स्मृती इराणी, ममता बॅनर्जी, प्रियंका चतुर्वेदी यांचा यामध्ये समावेश आहे. ट्विटरवर 1 जानेवारी ते 15 नोव्हेंबर 2019 दरम्यान युनिक ऑथर्सकडून ट्विटरवर करण्यात आलेल्या चर्चेमधून ही यादी जाहिर करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय क्षेत्रातील प्रभावी पुरूष नेत्यांच्या यादीमध्ये अव्वल स्थानी आहेत. त्यांच्या पाठोपाठ काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, भाजप खासदार गौतम गंभीर यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना स्थान मिळाले आहे.


तर प्रभावी नेत्या स्त्रियांमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अव्वल ठरल्या आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी, दिवंगत केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, शिवसेना उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी, अल्का लांबा, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती, जम्मु-काश्मिरच्या मुख्यमंत्री मेहमुबा मुफ्ती आणि आपच्या आतिशी या नेत्यांचा समावेश आहे.


दरम्यान सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत । उन्होंने कहा, हम साथ मिलकर बढ़ेंगे, साथ मिलकर समृद्ध बनेंगे और साथ मिलकर ही एक मजबूत एवं समावेशी भारत का निर्माण करेंगे। असे नरेंद्र मोदी यांचे ट्विट यंदा गोल्डन ट्विट ठरले आहे.

Leave a Comment