२०१९ मध्ये या बॉलीवूड स्टार्सचे पडद्यावर झाले नाही दर्शन


चालू वर्ष संपायला आता थोडे दिवस राहिले असताना या वर्षी कोणते चित्रपट गाजले, कोणते कलाकार गाजले याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यंदा अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड नोंदविले आहे. मात्र यंदाचा वर्षातील विशेष म्हणजे अनेक सेलेब्रिटी स्टार या वर्षात पडद्यावर आलेच नाहीत. यात शाहरुख खान, आमीर खान, रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय, अनुष्का शर्मा, इरफान अश्या अनेक नामवंत स्टार्सचा समावेश आहे.

शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांचा झिरो हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला आणि त्याला फार यश मिळाले नाही. त्यानंतर हे दोन्ही स्टार नव्या चित्रपटात दिसलेले नाहीत. अर्थात २०२० सालात अनुष्काचा अर्जुन कपूर सोबत कनेडा चित्रपट रिलीज होणार आहे. दीपिका पदुकोण २०१८ मध्ये अनेक दमदार रोल करून खूप चर्चेत होती. मात्र २१०९ मध्ये तिचा एकही चित्रपट आलेला नाही. पुढच्या वर्षात तिचा छपाक आणि ८३ असे दोन चित्रपट येत आहेत.


रणबीर कपूरच्या २०१८ मध्ये आलेल्या संजूचे खूप कौतुक झाले आहे. मात्र त्याचा आगामी ब्रह्मास्त्र २०२० मध्ये रिलीज होणार आहे. आमीर खान ठग्स ऑफ हिंदोस्ता नंतर पडद्यावर दिसलेला नाही. त्याचा आगामी लालसिंग चढ्ढा ह चित्रपट २०२० च्या नाताळ मध्ये येणार आहे. म्हणजे अजून एक वर्ष आमीर पडद्यावर दिसणार नाही. ऐश्वर्या राय चा फन्ने खा २०१८ मध्ये आला असून या नंतर तिचा मणिरत्नम सोबतचा चित्रपट पुढील वर्षात येणार आहे. अभिषेक बच्चन याचा मनमर्जीया २०१८ मध्ये आला असून पुढील वर्षात त्याचे दोन चित्रपट येत आहेत.

इरफान खान २०१८ मध्ये ब्लॅक मेल आणि कारवा या दोन चित्रपटात दिसला पण २०१९ मध्ये त्याची अनुपस्थिती जाणवली. २०२० मध्ये करीना सोबत त्याचा इंग्लिश मिडीयम चित्रपट येत आहे.

Leave a Comment