ओप्पो रेनो ३ प्रो १२ जीबी रॅम सह येणार


चीनी स्मार्टफोन कंपनी ओप्पो त्यांच्या नवा स्मार्टफोन रेनो ३ प्रो लवकरच सादर करणार असून त्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. मात्र या फोनचे अनेक लिक्स यापूर्वीच जाहीर झाले आहेत. नवीन लिक्स प्रमाणे हा फोन १२ जीबी रॅम सह असेल. ही माहिती डिजीटल चॅट स्टेशनचा हवाला देऊन दिली गेली आहे.

यापूर्वीच्या लिक्स नुसार या फोनला ८ जीबी रॅम दिली जाणार होती. या फोनला स्नॅपड्रॅगन ७६५ जी प्रोसेसर दिला जाईल आणि या प्रोसेसरसह येणारा कंपनीचा हा दुसरा फोन असेल. कर्व्हड डिस्प्ले, पंचहोल कॅमेरा, ४०२५ एएमएचची बॅटरी, ४८ एमपीचा प्रायमरी सेन्सर त्याला दिला जाईल. ६.५ इंची अमोलेड डिस्प्ले असेल. कंपनीचे उपाध्यक्ष ब्रायन शेन यांनी हा फोन ड्युअल बँड ५ जी सपोर्ट सह असेल असे संकेत यापूर्वीच दिले आहेत.

Leave a Comment