महिला अत्याचारामुळे दुःखी सोनिया साजरा करणार नाहीत वाढदिवस


उन्नाव घटनेतील अत्याचारग्रस्त मुलीचा मृत्यू, हैद्राबाद येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची झालेली हत्या आणि एकंदरीत गेल्या काही दिवसात महिलांवर अत्याचार होण्याच्या वाढलेल्या घटनांमुळे दुःखी झालेल्या कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमवारी सोनिया गांधी वयाची ७३ वर्षे पूर्ण करून ७४ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. मात्र यंदा हा वाढदिवस साजरा केला जाणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. देशात महिलांविरोधात होत असलेल्या अत्याचारांमुळे दुःख होते असे त्या म्हणाल्या.

गेल्या वर्षी उन्नाव येथे बलात्काराची घटना घडली. बलात्काराचे आरोपी जामिनावर सुटल्यावर पिडीत मुलगी वकिलांच्या भेटीसाठी जात असताना तिच्यावर ५-६ जणांनी चाकू हल्ला करून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता त्यात ती ९० टक्के भाजली होती. तिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला लखनौ येथून दिल्लीला सफदरजंग रुग्णालयात हलविले गेले त्यात तिचा नुकताच मृत्यू झाला. त्यापूर्वी हैदराबाद येथे डॉक्टर तरुणीवर सामुहिक बलात्कार करून तिला जाळून ठार करण्यात आले. असे अपराध वाढत चालल्याबद्दल सोनिया यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Leave a Comment