पिलांना जन्म देण्याचे या कुत्रीने केले रेकॉर्ड


सोशल मिडीयाच्या जमान्यात कोण, कशाचे, कधी आणि कसे रेकॉर्ड नोंदवेल हे सांगणे अवघड आहे. त्यात या वेगवान माध्यमामुळे अश्या बातम्या वाऱ्याच्या वेगाने जगभर पसरतात. आता ब्रिटनच्या एका कुत्रीने एकाचवेळी २१ पिलांना जन्म देऊन रेकॉर्ड केले आहे. तिचे हे रेकॉर्ड जागतिक रेकॉर्ड म्हणून नोंदविले जाईल अशी चर्चा आहे. यापूर्वी टिया नावाच्या एका नेपोलियन जातीच्या कुत्रीने एकावेळी २४ पिलांना जन्म देऊन जागतिक रेकॉर्ड केले आहे. मात्र टिया चे सिझेरियन करून पिले बाहेर काढली गेली होती तर या कुत्रीने नैसर्गिक प्रसुतीतून २१ पिले जन्माला घातली आहेत.

मेरी जेन असे या कुत्रीचे नाव आहे. तिची मालकीण जोना हयाना सांगते मेरीचे पोट यावेळी जरा जास्त मोठे दिसत होते पण तिला ६-७ पिले होतील असे मला वाटत होते. तिने २१ पिलांना जन्म दिल्याचे पाहून मला आश्चर्य वाटते. दुर्दैवाने त्यातील सहा पिले जन्मताच मृत्युमुखी पडली पण बाकीची १४ एकदम मस्त आणि सुदृढ आहेत. जेनीची पिले रॉटविलर आणि बुलडॉग अशी क्रॉसब्रिड आहेत.

Leave a Comment