बंदीनंतरही याद्वारे पॉर्न पाहणाऱ्यांच्या प्रमाणात ४०० टक्क्यांनी वाढ


नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारसाठी इंटरनेटवरील अश्लील मजकूर किंवा व्हिडिओवर बंदी घालणे एक आव्हान बनले आहे. भारत सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पॉर्नहबसह एकूण ८५७ पॉर्न साइट्सवर बंदी घातली होती. पण लोकांना सरकारचा हा निर्णय आवडला नाही. तथापि, यावर नामी शक्कल वापरकर्त्यांनी शोधून काढली आहे. आता व्हीपीएनच्या (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) माध्यमातून आंबटशौकिन पॉर्न वेबसाइट पहात असल्याचे स्पष्ट होत आहे. ४००% ची वाढ व्हीपीएनद्वारे पोर्न वेबसाइट्स पाहण्याच्या प्रमाणात झाली आहे.

सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ८५७ पॉर्न वेबसाइट्सवर बंदी घातल्यानंतर, देशातील आघाडीच्या इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना एक पत्र लिहून या संकेतस्थळांवरील प्रवेश बंद करण्याचे दूरसंचार विभागाने निर्देश दिले होते. या पत्रात घटनेतील कलम १ ((२) नुसार अश्लील वेबसाइट्सवरील कंटेट अनैतिक आणि अश्लील असल्याचे म्हटले होते.

रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडियासह अन्य टेलिकॉम ऑपरेटरच्या वापरकर्त्यांसाठी ही बंदी लागू झाल्यानंतर या अश्लील वेबसाइट्समधील प्रवेश बंद करण्यात आला होता. त्यानंतर वापरकर्त्यांनी केवळ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच यावर टीका केली नाही, व्हीपीएन, प्रॉक्सी आणि इतर साधनांद्वारे बंदी घातलेल्या वेबसाइटवर जाणे देखील सुरू केले.

व्हीपीएन अ‍ॅप्स मोबाइलवर डाउनलोड करून बंदी घातलेल्या अश्लील वेबसाइट्सवर जाण्याच्या प्रमाणात ४०५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यानंतर, अश्लील वेबसाइटवर व्हीपीएनद्वारे प्रवेश करणार्‍यांची संख्या ५ कोटी ७० लाखांपर्यंत पोहोचली. ही आकडेवारी लंडनमधील व्हीपीएन पुनरावलोकन कंपनी असलेल्या ‘टॉप १० व्हीपीएन’ने जाहीर केली आहे. ऑक्टोबर २०१८ ते ऑक्टोबर २०१९ दरम्यान गूगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअर वरून डाउनलोड केलेल्या व्हीपीएन मोबाइल अ‍ॅप्सच्या आधारे ही आकडेवारी काढली गेली आहे.

या बंदीची अंमलबजावणी झाल्यानंतर व्हीपीएन सर्चमध्ये अचानक वाढ झाली असल्याचे संशोधन करणाऱ्या कंपनीने म्हटले आहे. मोबाइल व्हीपीएन डाउनलोडची सरासरी ऑक्टोबर २०१८ ते डिसेंबर २०१८ दरम्यान दरमहा ६६% पर्यंत वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतातील बहुतेक व्हीपीएन सेवा विनामूल्य असून वापरकर्त्यांचा डेटा विकून हे अॅप पैसे कमवतात. फ्री टर्बो व्हीपीएन देशातील १० दशलक्ष वापरकर्ते वापरतात. त्याच वेळी, ७ दशलक्ष वापरकर्ते सोलो व्हीपीएन आणि हॉटस्पॉट शिल्ड फ्री वापरतात. १ कोटी ८ दशलक्ष वापरकर्त्यांसह एक्सप्रेस व्हीपीएन अव्वल स्थानी आहे.

Leave a Comment