पुरातत्वशास्त्रज्ञांनी शोधले हजारो वर्षांपुर्वीचे वायकिंग जहाज

पुरातत्वशास्त्रज्ञांनी 1000 वर्षांपेक्षा अधिक जुने वायकिंगच्या काळातील जहाज शोधले आहे. हे जहाज नॉर्वेतील एका शेतकऱ्याच्या जमिनीखाली आढळून आले आहे. ग्राउंड पेनेट्रॅटिंग रडारद्वारे (भू-भेदक) स्कॅन करताना हे एक हजार वर्षांपेक्षा जुने जहाज सापडले आहे.

नॉर्वेच्या इंस्टिट्यूट फॉर कल्चर हेरिटेज रिसर्चनुसार, हे जहाज 55 फूट लांब असण्याची शक्यता आहे. वायकिंगचे राजा अथवा प्रमुखाला दफन करण्यासाठी या जहाजेचा वापर करण्यात येत असे. त्यावेळी दफन करताना जेवढे मोठे जहाज आणि स्तूप असेल तेवढी महत्त्वाची ती व्यक्ती असे.

नॉर्वेतील इडॉय आयलंड येथे 22 नोव्हेंबरला  इंस्टिट्यूट फॉर कल्चर हेरिटेज रिसर्चने या जहाजेचा शोध घेतला. ज्या जागेवर ही जहाज आढळली आहे, ती एक ऐतिहासिक जागा असून, या ठिकाणी वायकिंगची अनेक युद्ध झालेली आहेत.

पुरातत्वशास्त्रज्ञ पास्चे यांच्या मते, या जहाजेत एखाद्याला दफन केलेले आहे की, केवळ संपत्ती आणि हत्यारं आहेत याबाबत अद्याप माहिती नाही. त्यांचे मते नॉर्वेमध्ये सापडलेले केवळ चौथे जहाज आहे, जे चांगल्या परिस्थितीत सापडलेले आहे.

पास्चे यांच्या मते, हे जहाज वायकिंगच्या काळातील 800 ते 1000 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक जुने असण्याची शक्यता आहे. मागील वर्षी नॉर्वेच्या हॅल्डेन येथे सापडलेल्या जहाजेत आणि आता सापडलेल्या जहाजेत अनेक साम्य आहेत.

Leave a Comment