भारतात लाँच झाला तब्बल 12 कोटींचा टिव्ही

सॅमसंग कंपनीने द वॉल नावाची टिव्ही सीरिज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये 146 इंच (4के हाय डेफिनिशन), 219 इंच (6के हाय डेफिनिशन) आणि 292 इंच (8के हाय डेफिनिशन) च्या एलईडी पॅनेलचा समावेश आहे. या सीरिजमध्ये 0.8 पिक्सल पिच टेक्निकचा वापर करण्यात आला आहे.

कंपनीच्या या स्मार्ट टिव्हीची किंमत 3.5 कोटी ते 12 कोटींपर्यंत आहे. ग्राहक हे तिन्ही टिव्ही कंपनीच्या ब्रिफिंग सेंटरवरून खरेदी करू शकता. जे गुरूग्राम येथे आहे. भारतात या पॅनेलचे लग्झरी आणि वॉल प्रो हे व्हेरिएंटच उपलब्ध आहेत.

(Source)

या टिव्हीचा डिस्प्ले 30एमएम डेप्थ पेक्षा कमी आहे. वॉल सीरिजच्या तिन्ही व्हेरिएंटमध्ये एआय पिक्चर इनहँसमेंट, हाय ब्राइटनेस आणि हाय कॉन्ट्रॅक्ट सपोर्ट मिळेल. याशिवाय तिन्हीमध्ये मायक्रो एलईडी डिस्प्ले एआय अपस्केलिंग क्वांटम एचडीआर टेक्निक दिली आहे.

(Source)

ग्राहक या पॅनेलमध्ये अल्ट्रा लग्झरी व्यूइंगद्वारे गेमिंग आणि फिल्म पाहण्याचा आनंद घेऊ शकतात.

कंपनीने नवीन वर्षासाठी या सीरिजचे केवळ 25 ते 30 युनिट्सच तयार केले आहेत. जर नवीन वर्षात या सीरिजची मागणी चांगली असेल तर 2021 मध्ये कंपनी याचे उत्पादन आणखी वाढवेल.

Leave a Comment