भाजप सरकारच्या काळातील कामांना ठाकरे सरकारची स्थगिती


मुंबई : तत्कालीन भाजप सरकारला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने आणखी एक दणका दिला आहे. ठाकरे सरकारने भाजप सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामांना स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील विकासकामांचा प्रामुख्याने समावेश आहे. दोन कोटींपासून 25 कोटी रुपयांपर्यंत या कामांना अनुदान मिळाले होते.

ही कामे भाजप सरकारच्या काळात मंजूर झाली होती. पण सरकारने कामांचे वाटप करताना पक्षपातीपणा केल्याचा आरोप तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केला आहे. भाजपच्या आमदारांना बहुतांश कामे ही मिळाल्याचा दावा त्यांचा असल्यामुळे कार्यारंभाला मंजुरी न दिलेल्या कामांना स्थगिती देण्याचे आदेश ठाकरे सरकारने दिले आहेत.

या कामांना ठाकरे सरकारने दिली स्थगिती

  • ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे
  • कोकण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गतील कामे
  • ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्र विकासाची कामे
  • यात्रा स्थळांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम
  • या अंतर्गत मंजूर झालेल्या 2019-20 सालातील कामांना स्थगिती देण्याचे आदेश
  • या योजनेअंतर्गत अजूनही कार्यआरंभ मंजुरी न दिलेल्या कामांना स्थगिती देण्याचा आदेश

Leave a Comment