
वॉशिंग्टन – सोशल मीडियावर गोल गोल डोळे व लटकणारी जीभ यामुळे प्रसिद्धीस आलेल्या वयाच्या ८ व्या वर्षी अमेरिकी मांजरीचा मृत्यू झाला. तिला इन्स्टाग्रामवर २४ लाखांहून अधिक फॉलो करत. तिच्या निधनाची माहिती या मांजरीची मालकीण माइक ब्रिडावस्की यांनी इन्स्टाग्रामवर दिली.
नासाने इन्स्टाग्रामवर २४ लाख फॉलोअर्स असलेल्या मांजरीला वाहिली श्रद्धांजली
ब्रिडावस्की म्हणतात, बब हिने चिरनिद्रा घेतली असून बबच्या जन्मापासून अडचणीचा तिने सामना केला. खुजेपणाची तिला व्याधी होती. तिच्या हाडाला संसर्ग झाला होता. बबने तिच्या आयुष्यात प्राण्यांवर उपचार व मदतीसाठी ५ कोटी रुपये (७ लाख डॉलर) गोळा करण्यासाठी मदत केली होती.
नासाने बबच्या मृत्यूनंतर ट्विट करताना म्हटले, स्पेसमध्ये आम्ही भेटू. प्रिय बब, तुझा प्रवास सुखाचा होवो. बब सुमारे दोन महिन्यांची असताना ब्रिडावस्कीला लिल भेटली होती. ती तेव्हापासून तिच्याजवळच असायची. लिल बबवर “लिल बब अँड मॅजिक; ए साउंडट्रॅक टू द युनिव्हर्स’ नावाचा माहितीपटही येऊन गेला आहे. बबवर संगीत अल्बमही काढण्यात आला होता.
त्याचबरोबर “स्नूप डॉग ऑन म्यू द ज्वेल्स’ नावाचा रिमिक्स अल्बम आला होता. तिचे सोशल मीडियावर सर्वप्रथम छायाचित्र टम्बलरवर ती दोन महिन्यांची असताना प्रसिद्ध झाले. यानंतर तिला रेडिटने पहिल्या पानावर स्थान दिले. ती त्यानंतर इतकी प्रसिद्धीच्या झोतात आली की तिची मालकीण माइक ब्रिडावस्की यांनी तिचे छायाचित्र असलेले टीशर्ट्स, कॅलेंडर्स आदींची विक्री सुरू केली. त्यातून मिळालेली रक्कम अॅनिमल रेस्क्यू ग्रुप व अॅडॉप्शन सेंटरला देण्यात आली.
