परदेशातून कांदा आयात, पुढील आठवड्यात कमी होणार दर

आकाशाला भिडलेले कांद्याचे भाव पुढील आठवड्यात कमी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने कांदा आयात केला आहे. 10 डिसेंबरपासून परदेशातून 1.10 लाख टन कांदा येण्यास सुरूवात होईल. सरकारने हा कांदा 52 ते 55 रुपये प्रती किलो मागवला आहे.

मंगळवारी मुंबईत कांद्याचे भाव प्रती किलो 120 रुपये होते. देशातील एकूण कांदा उत्पादनाचे 30 टक्के कांदा हा महाराष्ट्रात तयार होतो. पावसामुळे यावर्षी कांद्यावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. मागील वर्षी महाराष्ट्रात 80.47 लाख टन कांद्याचे उत्पादन झाले होते. जे यावर्षी 65 लाख टनावर आले आहे. यंदा 15.47 लाख टन कांद्याचे उत्पादन कमी झाले आहे.

आयात करण्यात आलेला कांदा 10 डिसेंबरला मुंबईच्या जेएनपीटी बंदरावर उतरवण्यात येईल. येथे 1160 टन कांदा उतरवला जाईल. त्यानंतर संपुर्ण देशात पाठवला जाईल. 17 डिसेंबरपर्यंत 1450 टन, 24 डिसेंबरपर्यंत 2030 टन आणि 31 डिसेंबरपर्यंत 1450 टन कांदा मुंबईत येईल. इतर राज्यातील बंदरांवर देखील कांदा उतरवला जाईल.

इस्त्रालय, तुर्की आणि नेदरलँडवरून आतापर्यंत 6000 टन कांदा आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील 3 आठवड्यात 6 हजार टन कांदा भारतात आला असून, पुढील 1-2 दिवसात आणखी 1 हजार टन कांदा पोहचेल. यामुळे कांद्याचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. लासलगाव मंडईत बुधवारी कांद्याचे भाव 2500 ते 8812 रुपये प्रति क्विंटल होते.

Leave a Comment