अबुधाबीच्या प्रिन्सने स्वतः घरी जाऊन का घेतली या लहान मुलीची भेट ?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे एखाद्या देशाच्या प्रिन्सला एका लहान मुलीला भेटण्यास जावे लागले, असे कसे होवू शकते ? मात्र असे झाले आहे. एका व्हायरल व्हिडीओमुळे अबुधाबीचे प्रिन्स शेख मोहम्मद यांना एका लहान मुलीला भेटण्यासाठी तिच्या घरी जावे लागले.

सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यूएईच्या दौऱ्यावर होते. या वेळी दोन्ही देशांच्या कार्यक्रमादरम्यान सौदी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि अबूधाबीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन झायद अल नाह्यान हे लहान मुलींची भेट घेत होते. दोन्ही बाजूंना मुली उभ्या होत्या. एकाबाजूने सौदीचे प्रिन्स हात मिळवत होते, तर दुसऱ्या बाजूला अबूधाबीचे प्रिन्स होते. तेवढ्यात एक मुलगी सौदी प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या रांगेतून धावत जात अल नाह्यान यांच्या रांगेत हात मिळवण्यासाठी उभी राहते. मात्र अल नाह्यान हात न मिळवताच पुढे निघून जातात.

यामुळे मुलगी निराश होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अबूधाबीचे प्रिन्स अल नाह्यान स्वतः मुलीच्या घरी तिची भेट घेण्यास गेले. या मुलीचे नाव आयशा मोहम्मद मशहीत अल मजरोई आहे. अल नाह्यान यांनी मुलीच्या घरच्यांची देखील भेट घेतली.

Leave a Comment