सुंदर पिचाई आता झाले गुगलच्या मुख्य कंपनीचे सीईओ

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटचे सीईओ म्हणून देखील कार्यभार स्विकारला आहे. या सोबतच ते जगातील सर्वात शक्तीशाली कार्पोरेट नेत्यांपैकी एक झाले आहेत. गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन यांनी अल्फाबेटमधून आपले पद सोडले आहे.

21 वर्षानंतर लॅरी पेज कंपनीच्या सीईओ पदावरून पायउतार होणार आहेत. पिचाई यावर म्हणाले की, या बदलांमुळे अल्फाबेटवर काहीही परिणाम होणार नाही.  मी गुगलवर लक्ष केंद्रित करेल व सोबतच कॉम्प्युटिंगचा आवाका वाढवण्यासाठी आणि गुगल प्रत्येकासाठी अधिक फायदेशीर करण्यासाठी काम करत राहिल.

सुंदर पिचाई यांनी आपल्या मेलमध्ये म्हटले आहे की, अल्फाबेट आणि टेक्नोलॉजीद्वारे मोठ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी उत्साहित आहे.

पेज आणि ब्रिन म्हणाले की, सुंदर पिचाई यांनी अल्फाबेटच्या स्थापनेपासून, गुगलचे सीईओ असताना आणि अल्फाबेटच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या नात्याने 15 वर्ष आमच्यासोबत काम केले. अल्फाबेटच्या स्थापनेनंतर आतापर्यंत आम्ही कोणावरच एवढा विश्वास केला नाही. गुगल आणि अल्फाबेटचे भविष्यात एवढ्या चांगल्या पद्धतीने नेतृत्व कोणीच करू शकत नाही.

Leave a Comment