भारतीय वायूसेनेच्या स्मार्टफोन गेमचा बेस्ट गेम मध्ये गुगलकडून समावेश


भारतीय वायुसेनेने लाँच केलेल्या इंडीयन एअरफोर्स ए क्युट अबोड नावाच्या अँड्राईड गेमला गुगल प्ले स्टोर्सच्या बेस्ट ऑफ २०१९ अॅवॉर्ड टॉप लिस्ट मध्ये सामील करण्यात आले असून युजर्स चॉईस विनर्स मध्ये त्याला १० लोकप्रिय गेम मध्ये जागा मिळाली आहे. जगातील स्तरावर लाखो अँड्राईड युजर्स मध्ये लोकप्रिय ठरलेली अशी अॅप्स व गेम्स ही अॅवॉर्ड हायलाईट करतात.

भारतीय हवाई दलाने युवा तसेच लहान मुलांमध्ये लष्कराविषयी आकर्षण निर्माण व्हावे या उद्देशाने हा गेम तयार केला होता. त्याचे पहिले व्हर्जन ३१ मे रोजी सादर केले गेले आणि अँड्राईड तसेच आयओएस वर सुमारे २.२ दशलक्ष युजर्सनी तो डाऊनलोड केला. गेल्या वर्षीच्या व्हर्जन मध्ये सिंगल प्लेअर विंग कमांडर अभिनंदन याचे कॅरेक्टर होते आणि तो थ्री डी एअर कॉम्बॅट गेम होता. त्यात अभिनंदन प्रमाणे फायटर जेट उडवून शत्रू प्रदेश नष्ट करण्याची कारवाई करता येत होती. नवीन व्हर्जन मध्ये दोन गेम असून ते एकावेळी आठ प्लेअर् खेळू शकतात.

Leave a Comment