बलात्कारी स्वामी नित्यानंदाने स्थापला स्वतःचा देश


देशात अनेक गैरव्यवहार आणि बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेला आणि जामिनावर असताना फरारी झालेला स्वामी नित्यानंद यांच्या संदर्भात एक खळबळजनक बातमी रिपब्लिकन भारतने दिली असून या बलात्कारी बाबाने स्वतःचा स्वतंत्र देश स्थापन केला असून त्याला संयुक्त राष्ट्राची मान्यता घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. इक्वाडोर जवळ एक खासगी बेट नित्यानंद याने खरेदी केले असून त्याचे नाव कैलास असे ठेवले आहे. या देशाचा ध्वज, पासपोर्ट आणि प्रतिक चिन्हे डिझाईन केली गेली आहेत. त्रिनिनाद आणि टोबॅगो जवळ हे बेट आहे.


हा कैलास देश हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. देशाला पंतप्रधान आणि कॅबिनेट आहे. लोकांना देशासाठी दान देण्याचा आवाहन केले गेले आहे. जे दान देतील त्यांना देशाचे नागरिकत्व दिले जाणार आहे. वेबसाईटवरील माहितीत देशाचे दोन पासपोर्ट असून एक सोनेरी तर दुसरा लाल रंगाचा आहे. देशाच्या ध्वजाचा रंग मरून आहे आणि त्यावर सिंहासनावर बसलेले स्वामी नित्यानंद आणि नंदीबैल यांच्या प्रतिमा आहेत. देशाच्या व्यवस्थापनासाठी दहा विभाग केले गेले असून त्यात संरक्षण, अर्थ, वाणिज्य, शिक्षण विभाग आहेत. नित्यानंद याने भारतात तो हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करत होता पण त्यामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे संयुक्त राष्ट्रात सांगितले आहे.

बलात्काराच्या आरोपाखाली या बाबाला भारतात अटक करण्यात आली होती मात्र जामीन मंजूर होताच त्याने नेपाळ मार्गे व्हेनेझुएलामध्ये बनावट पासपोर्टच्या मदतीने पलायन केले असून त्याला फरारी घोषित करण्यात आले आहे. त्याच्यावर १ वर्षात न्यायालयाने ४३ समन्स बजावली आहेत.

Leave a Comment