चीन मध्ये सीमकार्ड खरेदी साठी करावे लागणार फेसस्कॅन


सायबर स्पेसवर नियंत्रण राखण्यासाठी चीन मध्ये सीम कार्ड खरेदी संदर्भात नवा नियम केला गेला असून तो नुकताच डिसेंबर पासून अमलात आणला गेला आहे. जगात कुठेही सीम कार्ड खरेदी करताना ग्राहकाला ओळखपत्र दाखवावे लागतेच पण चीन मध्ये नव्या नियमानुसार ग्राहकाला फेसस्कॅनही करावे लागणार आहे. फेसस्कॅनिंग व ओळखपत्र मॅच झाल्यानंतरच सीम मिळू शकेल. याचाच अर्थ चीन मध्ये सीम खरेदी कुणालाही सहज साध्य नसेल.

या वर्षीच्या सप्टेंबरमध्येच चीन उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या संदर्भात नोटीस जारी केली होती. ऑनलाईन नागरिक सुरक्षा आणि नागरिक हित जपण्यासाठी मोबाईल नेटवर्क घेताना योग्य नाव नोंदविणे आणि चेहरा स्कॅन करणे त्यासाठी बंधनकारक केले गेले होते. यापूर्वी जनगणना करताना चेहरा ओळख पटविणारे तंत्र – फेशियल रेकॉगनीझन या तंत्राचा वापर सुरु केला गेला आहे. तसेच इंटरनेट प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन कंटेंट टाकण्यापूर्वी युजरच्या ओळखीची खात्री पटविणे बंधनकारक केले गेले आहे.

Leave a Comment