फेक डिलिव्हरी बॉय बनून एका पठ्ठ्याने चोरली तब्बल 16 लाखांची दारू

ब्रिटनच्या लिव्हरपूल येथे एका व्यक्तीने डिलिव्हरी बॉय बनून तब्बल 300 व्हिस्कीच्या बाटल्या चोरी केल्याची घटना घडली आहे. या बाटल्यांची किंमत 18000 यूरो (जवळपास 16 लाख रुपये) आहे.

एक व्यक्ती McBurney Transport चा फेक डिलिव्हरी बॉय बनून आला आणि दारूच्या बाटल्या उडवल्या. या चोराने टोपी घातली होती व हाय व्हीएलएस जॅकेट घातले होते. जेणेकरून त्याच्यावर संशय येणार नाही.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या व्यक्तीने ही संपुर्ण चोरी एकट्याने केली. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की, हा एक नक्कीच हुशार चोर असला पाहिजे. कारण, या बाटल्या ब्लॅक मार्केटमध्ये देखील विकता येत नाही. सध्या पोलीस सीसीटिव्ही फुटेज तपासत आहे व स्थानिकांकडे चौकशी करत आहेत.

Leave a Comment