
मराठमोळी अभिनेत्री व दिग्दर्शक-निर्माते महेश कोठारे यांची सून उर्मिला कोठारेने आपला कायापालट केला आहे. तिने नुकतीच आपल्या कायापालट झाल्याची झलक इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. या फोटोमधील उर्मिलाला ओळखणे देखील कठीण झाले आहे. नेटकऱ्यांसोबतच अभिनेत्रींनाही उर्मिलाचा हा कायापालट खूप आवडला आहे.
कोठारेंच्या सुनबाईंचा कायापालट पाहून इतर अभिनेत्रीही झाल्या गार
तिने या फोटोला स्त्रीकडे असलेली सर्वात मोहक संपत्ती म्हणजे आत्मविश्वास, असे कॅप्शन दिले आहे. या कॅप्शनप्रमाणेच तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि तिची भेदक नजर नेटकऱ्यांना भुरळ पाडत आहे.
तिच्या या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. उर्मिलाची क्रांती रेडकर, गिरीजा ओक, फुलवा खामकर यांनी कमेंट्समध्ये प्रशंसा केली आहे.
पती आदिनाथनेही उर्मिलाच्या फोटोवर ‘उफ्फ्फ..’ अशी कमेंट केली आहे. सध्या चित्रपटसृष्टीपासून उर्मिला दूर असून ती कुटुंबावर लक्ष केंद्रीत आहे. ती सोशल मीडियावर मुलगी जिजासोबतचे फोटो पोस्ट करत असते.
