आता कॉल रिसिव्ह करण्यासाठी द्यावे लागणार पैसे !

मोबाईल सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांनी नवीन टॅरिफ प्लॅन लागू केले आहेत. यामुळे ग्राहकांच्या खर्चात दीडपट वाढ होणार आहे. आता ग्राहकांना फेअर युजेज पॉलिसी अंतर्गत दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी दरमिनिटाला 6 पैसे द्यावे लागतील. पुढील काळात मोफत इनकमिंग कॉल पुर्णपणे समाप्त होण्याची शक्यता आहे.

एसबीआय कॅपिटल सिक्युरिटीज मुख्य संशोधक राजीव शर्मा म्हणाले की, जिओने अन्य नेटवर्कवर कॉल केल्यावर आययूसी चार्ज अंतर्गत 6 पैसे प्रती मिनिट घेण्यास सुरूवात केली आहे. आता आयडिया व एअरटेलने देखील एफयूपी लागू केले आहे.

ते म्हणाले की, वॉइस कॉलचे दर पुर्णपणे परत आले आहेत. हे दर शून्यापर्यंत जावू शकत नाहीत. कारण, कंपन्यांनी यासाठी एफयूपी आणि ऑफ नेटचा वापर सुरू केला आहे. शक्यता आहे की, दुरसंचार कंपन्या पुढील 6-9 महिन्यात स्वतःच्या नेटवर्कवर देखील कॉलिंगसाठी पैसे आकारण्यास सुरूवात करेल व त्यामुळे मोफत इनकमिंग कॉल पुर्णपणे समाप्त होईल.

दुरसंचार क्षेत्रातील विश्लेषकांच्या मते, 6 डिसेंबरला जिओने आपले नवीन टॅरिफ प्लॅन जारी केल्यावर ग्राहकांना फायदा होईल. कंपनीने आधी देखील म्हटले होते की, अन्य कंपन्यांच्या तुलनेत 20 टक्के स्वस्त टॅरिफ प्लॅन देईल. जिओकडे सर्वाधिक ग्राहक तर आहेतच. याशिवाय जिओचे 90 टक्के ग्राहक प्रीपेड आहेत. ज्यामुळे कमी शुल्क वाढून देखील कंपनी जास्त नफा मिळवू शकते.

Leave a Comment