फेसबुकच्या या टूलमुळे फोटो आणि व्हिडीओ ट्रांसफर करणे होणार सोपे

सोशल मीडिया कंपनी फेसबुकने ग्लोबल लेव्हलवर फोटो ट्रांसफर टूल लाँच केले आहे. त्याद्वारे युजर्स सोशल साइट्सवर शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ गुगल फोटो प्लॅटफॉर्मवर ट्रांसफर करू शकतील. सध्या कंपनी या टूलची टेस्टिंग आयर्लंडमध्ये करत आहे.

फेसबुकचे हे टूल युजर्सला अॅपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट आण ट्विटर यांच्यामध्ये डेटा ट्रांसफर करण्यास मदत करते. कंपनीने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले की, या टूलच्या माध्यमातून युजर्स वेगवेगळ्या साइज आणि सर्विसला सुरक्षितरित्या दोन प्लॅटफॉर्ममध्ये डेटा ट्रांसफर करू शकतात. याला डेटा पोर्टेबल म्हटले जाते.

डेटा ट्रांसफर एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म असून, त्याद्वारे सर्व ऑनलाइन सर्विस प्रोव्हाइडर्स आपल्या गरजेनुसार डेटा ट्रांसफर करू शकतील.

काही दिवसांपुर्वीच फेसबुकने युजर्ससाठी व्यू प्वाइंट अॅप लाँच केले होते. या अॅपद्वारे युजर्स सर्वेक्षण, टास्कसोबत रिसर्चमध्ये भाग घेऊन रिवॉर्ड प्वाइंट मिळवू शकतात.

Leave a Comment