पुढील वर्षाच्या जून महिन्यापासून देशभरात लागू होणार ‘एक देश, एक राशन कार्ड’


नवी दिल्ली- पुढच्या वर्षी 1 जूनपासून ‘एक देश, एक राशन कार्ड’ योजना देशभरात लागू होईल, अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी लोकसभेत प्रश्नोत्तरादरम्यान दिली. याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, सध्या 14 राज्यांमध्ये राशन कार्डसाठी पीओएस मशीनची सुविधा सुरू करण्यात आली असून ती सुविधा लवकरच देशातील सर्व राज्यात सुरु केली जाईल. ज्या वॉर्ड किंवा पंचायतमध्ये राशन कार्ड होते, त्याच परिसरातीतल सरकारी राशनच्या दुकानात आतापर्यंत राशन मिळत होते.

सामान्य नागरिकांना या योजनेमुळे भरपूर फायदा होणार आहे. यानंतर आता पीडीएस दुकानाशी लोक बांधिल राहणार नाहीत आणि त्यांना कधीही राशन मिळू शकेल. त्यांना राशन दुकानावर अवलंबुन राहण्याची गरज नसेल आणि भ्रष्टाचारच्या प्रमाणातही कमी येईल. पासवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या लोकांना या योजनेचा फायदा होईल, जे कामानिमित्त इतर राज्यात राहतात. त्यांना कोणत्याही राज्यातील राशन दुकानावरुन आता राशन मिळेल.

अनेक राज्यात इंटीग्रेटिड मॅनेजमेंट ऑफ पीडीएस(आयएमपीडीएस) अंतर्गत खाद्य आणि सार्वजनिक वितरणाअंतर्गत लाभार्थी कोणत्याही जिल्ह्यातून राशन खरेदी करू शकतील. आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरल, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगाना आणि त्रिपुरा या राज्यांचा यात समावेश आहे.

Leave a Comment