आता चिरफाड न करता होणार पोस्टमॉर्टम


नवी दिल्ली- मंगळवारी राज्यसभेत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी सभागृहात प्रश्नोत्तरादरम्यान सांगितले की, पोस्टमार्टम करण्यासाठी यापुढे आता शरीराची चिरफाड करण्याची गरज नसेल. यासाठी एक नवीन तंत्र विकसित करण्यात आले असून ज्यात चिरफाड केल्याशिवाय पोस्टमॉर्टम केले जाऊ शकते.

याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, एक असे तंत्रज्ञान दिल्लीमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था(एम्स) आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने मिळून विकसित केले आहे, ज्याच्या मदतीने चिरफाड केल्याशिवाय शरीराचे परिक्षण करता येऊ शकते. या तंत्रज्ञानाच्या आधारे पुढील सहा महिन्यात मृतदेहांचे परीक्षण करणे सुरू होईल. याच्या मदतीने अनेक सूचना आणि माहिती डिजिटल पद्धतीने स्टोर करता येईल.

दिल्लीतील एम्समध्ये हे तंत्रज्ञान सुरुवातीला लागू केले जाईल. त्यानंतर हळु-हळू देशातील इतर रुग्णालयातही लागू होईल. या तंत्रज्ञानात मानवीय दृष्टीकोणतून बनवण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान वापरणारा दक्षिण आशियातील भारत पहिलाच देश आहे. सध्या जर्मनी, नार्वे, इजरायल, स्वीडन, ब्रिटेन आणि हॉगकॉगमध्ये हे तंत्रज्ञान वापरले जात आहे.

Leave a Comment