पंकजा मुंडे भाजप सोडून कुठेही जाणार नाहीत


मुंबई – सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात भाजप नेत्या पंकजा मुंडे पक्ष बदलण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरु असून पक्ष बदलण्याच्या पंकजा मुंडेंबाबत अफवा पसरवल्या जात असून या अफवा थांबवाव्यात, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. पंकजा मुंडे या भाजपच्या नेत्या कालही होत्या, आजही आहेत आणि उद्याही असतील, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

पंकजा मुंडे गेल्या दोन दिवसांपासून भाजप व्यतिरिक्त अन्य काही विचार करतील अशा चर्चा सुरु होत्या. अशा प्रकारच्या अफवा अपघाताने आलेल्या सरकारनंतर सुरु आहेत. अशा प्रकारच्या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही. आमचे पंकजा मुंडेंशी बोलणे झाले असून त्या ज्या स्थरावरुन मंत्री पदापर्यंत आल्या आहेत. त्यामुळे त्या अशाप्रकराचा विचार करणार नाहीत, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, ज्यावेळी कोणताही मोठा नेता हारतो तेव्हा तो दु:खी होतो. आत्मचिंतन सुध्दा करतो. नविन मार्ग शोधण्यासाठी ते आत्मचिंतन होत नसल्यामुळे या प्रकारच्या अफवांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, १२ डिसेंबर रोजी स्वर्गिय गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिवस कार्यक्रमाला आम्ही सर्वजण जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment