यशोगाथा : ज्या न्यायालयात वडील होते शिपाई, त्याच ठिकाणी मुलगी बनली न्यायाधीश

असे म्हटले जाते की, मेहनतीने तुम्ही जगातील कोणतीही गोष्ट मिळवू शकता. न्यायालयात एकेकाळी शिपाईची नोकरी करणाऱ्यांची मुलगी आज न्यायाधीश बनली आहे. अर्चनाने सांगितले की, तिचे वडील गौरीनंदन दररोज कोणत्यातरी न्यायाधीशासाठी काम करत असे. लहानपणी ते आवडत नसे. त्याचवेळी शिकत असताना शिपाई क्वार्टरमध्ये न्यायाधीश बनण्याचे स्वप्न बघितले होते आणि आज देवाने ते पुर्ण केले आहे.

अर्चनाने पुढे सांगितले की, स्वप्न तर न्यायाधीश बनण्याचे बघितले होते. मात्र हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. विवाहित आणि एका मुलाची आई असताना देखील हार न मानता स्वप्न पुर्ण केले.

पटनाच्या कंकडबाग येथे राहणाऱ्या अर्चनाची बिहार न्यायिक सेवा स्पर्धा परिक्षेत निवड झाली आहे. तिचे वडील गौरीनंदन सारण जिल्ह्यातील सोनपूर व्यवहार न्यायालयात शिपाई होते. अर्चनाने शास्त्रीनगर राजकीय उच्च विद्यालयातून 12 वीचे शिक्षण घेतले. त्यानंतर पटना युनिवर्सिटीमधून पुढील शिक्षण घेतले.

अर्चना सांगते की, लग्न झाल्यावर वाटले की तिचे स्वप्न पुर्ण होणार नाही. मात्र परिस्थिती बदलली व अर्चनाने पुणे विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर पटनाला परतून तीने 2014 ला बीएमटी लॉ कॉलेजमधून एलएलएमचे शिक्षण पुर्ण केले.

अर्चनाने सांगितले की, तिने 5 वर्षांच्या मुलासोबत दिल्लीत अभ्यास देखील केला व कोचिंग देखील चालवले. परंतू आपले स्वप्न नेहमी पुढे ठेवले. अनेक अडचणी आल्या मात्र स्वप्न काही सोडले नाही. आपल्या दुसऱ्याच प्रयत्नात तिने परिक्षेत यश मिळवले.

Leave a Comment