हे आहेत जगातील सर्वाधिक पगार मिळवणारे 20 राष्ट्रप्रमूख

जगात प्रत्येक देशाची एक प्रमुख व्यक्ती असते. काही देशात राष्ट्रपती तर काही ठिकाणी पंतप्रधान हे देशाचे प्रमुख असतात. देशातील प्रमूख व्यक्तींना पगार आणि भत्ते देखील त्याच प्रकारे दिले जातात. जगभरातील मुख्य देशातील प्रमूख नेत्यांना किती पगार दिला जातो हे तुम्हाला माहिती आहे का ? चला जाणून घेऊया.

(Source)

20. एदुआर्द फिलिप

एदुआर्द फिलिप हे फ्रान्सचे पंतप्रधान आहेत. त्यांचे वार्षिक वेतन 2,20,505 डॉलर (जवलपास 1.57 कोटी रुपये) आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती एम्युनैल मॅक्रॉन हे आहेत. त्यांना देखील एवढेच वेतन आहे.

(Source)

19. जिम्मी मोराल्स

जिम्मी मोराल्स हे गौतमाला देशाचे राष्ट्रपती असून, त्यांचा वार्षिक पगार 2,27,099 डॉलर (जवळपास 1.62 कोटी रुपये) आहे.

(Source)

18. लिओ वराडकर

लिओ वराडकर हे आयर्लंडचे पंतप्रधान आहेत. त्यांचा वार्षिक पगार हा 2,34,447 डॉलर (जवळपास 1.67 कोटी रुपये) आहे.

(Source)

17. कॅटरीन जॅकोब्स्दोतिर

कॅटरीन जॅकोब्स्दोतिर या आइसलँडच्या पंतप्रधान आहे. त्यांना 2,42,619 डॉलर (जवळपास 1.73 कोटी रुपये) वार्षिक पगार मिळतो. आइसलँडमध्ये राष्ट्रपतींना पंतप्रधानांपेक्षा अधिक वेतन आहे. मात्र पंतप्रधानांकडे अधिक अधिकार आहेत.

(Source)

16. स्टीफन लॉफेन

स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफेन हे यांचे वार्षिक वेतन हे 2,44,615 डॉलर (जवळपास 1.75 कोटी रुपये) आहे. स्टीफन यांनी वेल्डर म्हणून आपले करिअर सुरू केले होते. मात्र त्यांनी ट्रेड युनियन म्हणून ओळख मिळवत राजकारणात नाव कमवले.

(Source)

15. मेट्टे फ्रेडेरिकसेन

मेट्टे फ्रेडेरिकसेन या डेनमार्कच्या पंतप्रधान असून, त्यांचे वार्षिक वेतन 2,49,774 डॉलर (जवळपास 1.79 कोटी रुपये) आहे. डेनमार्कची राणी मार्ग्रेथ 2 यांना 1.35 करोड़ डॉलर (जवळपास 96.88 कोटी रुपये) पगार मिळतो. मात्र त्यांच्याकडे कोणतेही राजकीय पद नाही.

(Source)

14. एड्रियन हस्लर

एड्रियन हस्लर हे लिस्टेंस्टीन देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचा वार्षिक पगार हा  2,54,660  डॉलर (जवळपास 1.82 कोटी रुपये) आहे. राजकारणात येण्याआधी ते बँकर होते.

(Source)

13. सोफी विल्म्स

बेल्जियमच्या पंतप्रधान सोफी विल्म्स यांचे वार्षिक वेतन 2,62,964 डॉलर (जवळपास 1.88 कोटी रुपये) आहे.

(Source)

12. जस्टिन ट्रूडो

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचा वार्षिक पगार 2,67,041 डॉलर (1.91 कोटी रुपये) आहे.

(Source)

11. सिरिल रामाफोसा

सिरिल रामाफोसा हे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती आहेत. त्यांचे वार्षिक वेतन 2,73,470 डॉलर ( 1.96 कोटी रुपये) आहे.

(Source)

10. जेवियर बेटल

लग्जमबर्गचे पंतप्रधान जेवियर बेटल यांना वार्षिक वेतन 2,78,035 डॉलर (जवळपास 1.99 कोटी रुपये) आहे.

(Source)

09. ब्रिगिट बियर्लीन

ऑस्ट्रियाच्या चान्सलर ब्रिगिट बियर्लीन यांना वार्षिक पगार 3,28,584 डॉलर (जवळपास 2.35 कोटी रुपये) आहे.

(Source)

08. मोहम्मद औलद गजौनी

मोहम्मद औलद गजौनी हे अफ्रिकेतील देश मॉरिटानियाचे राष्ट्रपती आहेत. त्यांचा पगार3,30,000 डॉलर (2.36 कोटी रुपये) आहे.

(Source)

07. जेसिंडा अर्डर्न

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांचा वार्षिक पगार 3,39,862 डॉलर (जवळपास 2.43 कोटी रुपये) आहे.

(Source)

06. एंजेला मॉर्केल

जर्मनीच्या चान्सलर एंजेला मॉर्केल यांचे वार्षिक वेतन 3,69,727  डॉलर ( 2.65 कोटी रुपये) आहे. मॉर्केल ह्या जगातील सर्वात शक्तीशाली महिलांपैकी एक आहेत.

(Source)

05. स्कॉट मॉरिसन

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना वर्षाला 3,78,415 डॉलर (2.71 कोटी रुपये) एवढा पगार मिळतो.

(Source)

04. डोनाल्ड ट्रम्प

जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती असलेले डोनाल्ड ट्रम्प यांना वर्षाला 4,00,000  डॉलर (जवळपास 2.86 कोटी रुपये) पगार मिळतो. रिपोर्टनुसार, ट्रम्प आपला सर्व पगार दान करतात.

(Source)

03. उली मौरर

उली मौरर हे स्विझर्लंडचे राष्ट्रपती असून, त्यांचे वार्षिक वेतन 4,82,958 डॉलर (जवळपास 3.46 कोटी रुपये आहे.

(Source)

02. कॅरी लॅम

कॅरी लॅम या हाँगकाँगच्या चीफ एग्झिक्यूटिव्ह आहेत. त्यांचा वार्षिक पगार 5,68,400 डॉलर (जवळपास 4.07 कोटी रुपये) आहे.

(Source)

1. ली सियन लूंग

या यादीत सिंगापूरचे पंतप्रधान ली सियन लूंग या सर्वाधिक 16,10,000 डॉलर (जवळपास 11.54 कोटी रुपये) वार्षिक पगार आहे.

(Source)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 19.92 लाख रुपये वार्षिक वेतन मिळते. तर राष्ट्रपतींना 1.50 लाख रुपये प्रती महिना एवढा पगार आहे.

Leave a Comment