लग्न म्हटले की, खर्चाला काही मर्यादा नसते. सध्या लग्नात अफाट खर्च केला जातो. असेच गुजरातच्या जामनगरमधील एक लग्न चर्चेचा विषय ठरत आहे. गुजरातमधील जामनगर येथे एका कुटूंबाने मुलाच्या लग्नात 90 लाखांच्या नोटा उडवल्या आहेत. यामुळे हे लग्न सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. लग्नाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
मुलाच्या लग्नात कुटूंबाने उडवल्या तब्बल 90 लाखांच्या नोटा

जामनगरमधील चेला गावात जडेजा कुटूंबातील सदस्याचे लग्न होते. नवरदेव ऋषिराज जडेजा नवरीला हेलिकॉप्टरमधून कुनंड येथे घेऊन गेला. नवरदेवाच्या भावाने त्याला एक कोटींची गाडी देखील भेट दिली. परिवारानुसार, लग्नात उडवण्यात आलेल्या नोटा पाच गावातील गोशाळांना दान केल्या जाणार आहेत.
