‘मुन्ना बदनाम हुआ’ गाण्यात सलमानबरोबर थिरकला प्रभूदेवा

अभिनेता सलमान खानच्या दंबग 3 चित्रपटातील बहुप्रतिक्षित गाणे ‘मुन्ना बदनाम हुआ’ अखेर रिलीज झाले आहे. हे या वर्षीचे मोस्ट अवाटेड गाणे आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. गाणे रिलीज झाल्यापासूनच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

या गाण्यामध्ये सलमान खानसोबत लव्ह रात्री चित्रपटातील अभिनेत्री वरिना हुसैन आणि प्रभूदेवा देखील आहेत.

मुन्ना बदनाम हुआ गाण्याला साजिद-वाजिद या जोडीने संगीत दिले आहे. तर बादशाह, कमाल खान आणि ममता शर्माने हे गाणे गायले आहे. गाण्याचे लिरिक्स दानिश बसीरने लिहिले आहेत. रिलीज झाल्यापासून काही तासातच 10 मिलियन पेक्षा अधिक व्ह्यूज या गाण्याला मिळाले आहेत.

गाण्यातील सर्वात खास गोष्ट म्हणजे चाहत्यांना सलमान खान आणि प्रभूदेवा एकत्र या गाण्यात थिरकताना दिसणार आहेत. याआधी दोघेही ‘वॉन्टेड’ चित्रपटातील ‘मेरा ही जलवा’ या गाण्यात देखील दिसले होते.

दंबग 3 चे दिग्दर्शन प्रभूदेवाने केले आहे. याशिवाय चित्रपटा सलमानसोबतच सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर आणि सुदीप यांच्या प्रमूख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या 20 डिसेंबरला सर्वत्र रिलीज होणार आहे.

Leave a Comment