Video : 5 फूट बर्फात साधूचा भजनावर डान्स

हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखरावर एका साधूचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा साधू बर्फामध्ये शिरगुल महाराजांचे गुणगान गात आहेत. या ठिकाणी 5 फूट बर्फ जमा झाला आहे.

(सौजन्य – हिमाचल अभी अभी)

थरकाप उडणाऱ्या थंडीत साधू उघड्या पायाने आणि विना कपड्यांचे शिरगुल महाराजांचे भजन गात डान्स करत आहे. एवढ्या बर्फात साधू अशाप्रकारे गाणे गात डान्स करत असल्याचे पाहूण सर्वचजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव झालेला आहे. त्यामुळे प्रशासनाने शिखरावरतील प्रवाशांना जाण्यास बंदी घातली आहे. हिमाचल प्रदेशमधील सुंदर पर्यटन स्थळ कल्फा बर्फाच्छादित झाले आहे. हवामान खात्याने देखील अजून हिमवर्षाव होणार असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment