चहा पिल्यानंतरच कामास तयार होतो पोलीस दलातील हा घोडा

आपल्यातील अनेकांच्या दिवसाची सुरूवात ही चहा आणि कॉफीने होत असते. चहा किंवा कॉफी घेतल्यानंतरच कामास सुरूवात होती. इंग्लंडच्या एका पोलीस दलातील घोडा देखील या पेक्षा कमी नाही. मर्सीसाइट पोलीसांच्या एका घोड्याला देखील चहाची सवय लागली आहे. या घोड्याचे नाव जॅक असून, तो 20 वर्षांचा आहे. जवळपास  मागील 15 वर्षांपासून जॅक चहा पित आहे.

जॅकला रोज सकाळी चहा हवा असतो, चहा दिला नाहीतर जॅक काम करायला देखील तयार होत नाही. तो पुढील वर्षी निवृत्त होणार आहे. जॅक चहा पिण्यासाठी कपात जीभ बुडवतो. जॅकची ही सवय पोलीस कर्मचाऱ्यांना देखील माहिती झाली आहे, त्यामूळ त्याला देखील दररोज चहा दिला जातो.

जॅकला चहा देण्यासाठी एका विशेष कपाची देखील सोय करण्यात आलेली आहे. त्याला रोज सकाळी कामावर येण्याआधी चहा दिला जातो. मागील दोन आठवड्यांपासून जॅकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, आतापर्यंत 2 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज आणि हजारो लाईक्स आले आहेत.

जॅकला खूप गरम आणि मलई असलेला चहा आवडत नाही. त्यासाठी पॅक्ड दूध, 1 चमचा साखर व थंड पाणी मिळून चहा तयार केला जातो. 2 चमचे साखर टाकल्यावर तर तो अधिक खूष होतो.

Leave a Comment