पुढच्या वर्षी सुरु होणार ‘गोलमाल 5’चे शूटिंग


प्रेक्षकांना कॉमेडी आणि आपल्या धमाल अंदाजांने खळखळून हसवणाऱ्या ‘गोलमाल’ सिरीजचा पाचवा भाग लवकरच तयार करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे संकेत रोहित शेट्टीच्या ‘सिंबा’ चित्रपटातच देण्यात आले होते. त्यामुळे तेव्हाच ‘गोलमाल ५’ तयार होणार हे स्पष्ट झाले होते. या चित्रपटाच्या शूटिंगला पुढील वर्षी सुरूवात होणार आहे.

याबाबत एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाची कथा नविन आणि उत्कंठा वाढवणारी असेल. या चित्रपटाच्या शूटिंगला पुढच्या वर्षी सुरुवात होणार आहे. अजय देवगनसोबतच गोलमालच्या इतर स्टारकास्टची पुन्हा धमाल या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अरशद वारसी, कुणाल खेमू, तुषार कपूर, श्रेयस तळपदे आणि इतर कलाकारांच्या यामध्ये भूमिका पाहायला मिळणार आहेत. पण यात यावेळी काही नविन कलाकारांचाही समावेश राहणार आहे. यामध्ये मुख्य अभिनेत्री कोण असणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, पुढच्या वर्षीच हा शोध पूर्ण होणार आहे.

सध्या रोहित शेट्टी आपल्या आगामी ‘सुर्यवंशी’ चित्रपटावर काम करत आहे. यामध्ये अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ यांची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. तर, अजय देवगनही आपल्या आगामी ‘तानाजी – द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट १० जानेवारीला रिलीज होणार आहे.

Leave a Comment