या दिवशी रिलीज होणार 'द गर्ल ऑन द ट्रेन' - Majha Paper

या दिवशी रिलीज होणार ‘द गर्ल ऑन द ट्रेन’


सध्या सायना नेहवालच्या बायोपिकमुळे बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा चर्चेत आहे. ती याबरोबरच ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे शूटिंगही परिणीतीने पूर्ण केले आहे. तिचा चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज झाल्यानंतर आता या चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर करण्यात आली आहे.


८ मे २०२० रोजी हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असलेला ‘द गर्ल ऑन द सिटी’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. याच दिवशी अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट देखील रिलीज होणार असल्यामुळे परिणीती आणि सुशात सिंह राजपुतची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. परिणीतीने या चित्रपटातील तीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले असून तिने त्याला ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा माझ्या आयुष्यातील सर्वात रोमांचक प्रवास आहे’, असे कॅप्शन दिले आहे.

Leave a Comment