एका चॅलेंजसाठी कॅलिसने ठेवली अर्धी दाढी-मिशी


सोशल मीडियावर सध्याच्या दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस चांगलाच चर्चेत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कॅलिसने अर्धी दाढी आणि अर्धी मिशा अशा रुपातील एक फोटो शेअर केला आहे. त्याचा हा मजेशीर फोटो पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. पण त्याने हे सर्व एका चॅलेंजसाठी केले आहे.


जॅक कॅलिसचा सोशल मीडियावरील नवा अवतार पाहून त्याच्या चाहते हैराण झाले आहेतच. त्याचबरोबर सोशल मीडियावर त्याच्या या फोटोवर प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. पण त्याने असे का केले याचे कारण स्पष्ट केल्यानंतर नेटकरी त्याचे कौतुक करत आहे.


आपल्या अधिकृत इन्टाग्राम अकाउंटवरुन जॅक कॅलिसने आपला हाफ शेवसह एक फोटो शेअर केला आहे. खूप मजेशीर आगामी काही दिवस असणार आहेत. हे सर्व गेंडा आणि गोल्फच्या विकासाच्या कामासाठी सुरु असल्याचे कॅप्शन त्याने फोटोला दिले आहे. दक्षिण अफ्रिकेतील ‘सेव्ह द रायनो’ चॅलेंज ४४ वर्षी कॅलिसने स्वीकारले आहे. चेहरा आणि छातीवरील अर्धे केस या चॅलेंजमध्ये काढायचे आहेत. याचा उद्देश गेंडा संवर्धनासाठी जागरुकता निर्माण करण्याचा आहे. ‘सेव्ह द रायनो’ एक सामाजिक संस्था आहे. ही संस्था पशूसंवर्धानासाठी कार्यरत आहे.

Leave a Comment