मोदींची घोषणा, श्रीलंकेला 2865 कोटी रुपयांचे कर्ज

श्रीलंकेचे नवनिर्विचित राष्ट्रपती गोताबया राजपक्षे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज हैदराबाद हाउस येथे द्विपक्षीय बैठक पार पडली. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी 2865 कोटी रुपये कर्ज देणार असल्याची घोषणा केली आहे.तर 716 कोटी रुपये हे सोलर योजनांवर खर्च केले जातील.

मोदी म्हणाले की, आवास योजनेंतर्गत श्रीलंकेत 46 हजार घरांची निर्मिती केली जाईल. मूळच्या तामिळ लोकांसाठी 14 हजार घरे तयारी केली जातील.

मोदी पुढे म्हणाले की, तुम्हाला (गोताबया राजपक्षे) श्रीलंकेच्या जनतेकडून बहुमत मिळाले आहे. हे केवळ भारतासाठीच नाही तर संपुर्ण हिंद महासागरातील क्षेत्रासाठी महत्त्वपुर्ण आहे.  नेवरहूड फर्स्ट पॉलिसीअंतर्ग श्रीलंकेला प्रथम प्राथमिकता दिली जाईल. भारत नेहमीच दहशतवादाविरोधात लढत आला आहे. आम्ही श्रीलंकेला दहशतवाद्यांशी लढण्यासाठी 358 कोटी रुपयांची मदत करू.

श्रीलंकेचे राष्ट्रपती राजपक्षे म्हणाले की, भारताने श्रीलंकेद्वारे पकडलेल्या बोटींचा मुद्दा उपस्थित केला आहे. आम्ही आमच्याकडील सर्व बोटी लवकर सोडण्यासाठी पावले उचलू.

श्रीलंकेचे राष्ट्रपती राजपक्षे सध्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची देखील भेट घेतली. राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे.

Leave a Comment